Advertisement

मध्य रेल्वेवर धावली दुसरी बम्बार्डिअर लोकल

सकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी मध्य रेल्वेवरची दुसरी बम्बार्डिअर लोकल विद्याविहारहून कल्याणच्या दिशेने रवाना झाली. ती कल्याणला ७ वाजता पोहोचली. या लोकलच्या मध्य रेल्वेवर नऊ फेऱ्या होणार आहेत.

मध्य रेल्वेवर धावली दुसरी बम्बार्डिअर लोकल
SHARES

मंगळवारी म्हणजेच २६ डिसेंबरला मुंबईच्या मध्य रेल्वेवर दुसरी बम्बार्डिअर लोकल दाखल झाली आहे. सकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी ही विद्याविहारहून कल्याणच्या दिशेने रवाना झाली. ती कल्याणला ७ वाजता पोहोचली. या दुसऱ्या बम्बार्डिअर लोकलच्या मध्य रेल्वेवर नऊ फेऱ्या होणार आहेत.


असं असेल बम्बार्डिअरचं वेळापत्रक

  • पहिली फेरी विद्याविहारहून सकाळी ६ वाजून ०३ मिनिटांनी सुटून कल्याणला स. ७ वा.पोहचेल.
  • दुसरी फेरी कल्याणहून सकाळी ७ वाजून ०९ मिनिटांनी सुटून दादरला ८ वाजून १८ मिनिटांनी पोहचेल.
  • तिसरी फेरी दादरहून सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांनी सुटून ठाण्याला ९ वाजून १९ मिनिटांनी पोहचेल.
  • चौथी फेरी कल्याणहून दुपारी ४ वाजून ३२ मिनिटांनी सुटून सायंकाळी ६ वाजता सीएसएमटीला पोहचेल.
  • पाचवी फेरी जलद असून सीएसएमटीहून सायंकाळी ६ वाजून१० मिनिटांनी सुटून ठाण्याला ६ वाजून ५२ मिनिटांनी पोहचेल.
  • सहावी फेरी ठाण्याहून सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी सुटून दादरला रात्री ७ वाजून ३६ मिनिटांनी पोहचेल.
  • सातवी फेरी दादरहून रात्री ७ वाजून ४३ मिनिटांनी सुटून डोंबिवलीला रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.
  • आठवी फेरी डोंबिवलीहून रात्री ९ वाजून ०८ मिनिटांनी सुटून सीएसएमटीला १० वाजून ३२ मिनिटांनी पोहचेल.
  • तर, शेवटची नववी फेरी सीएसएमटीहून रात्री १० वाजून ३८ मिनिटांनी सुटून रात्री ११ वाजून ३३ मिनिटांनी ठाण्याला पोहचेल.


मध्य रेल्वेवर बम्बार्डिअरच्या एकूण २१ फेऱ्या

१८ तारखेला मध्य रेल्वेवर पहिली बम्बार्डिअर धावली. या लोकलच्या मध्य रेल्वेवर १२ फेऱ्या चालवण्यात येत आहेत. तर, २६ तारखेला मध्य रेल्वेवर दुसरी बम्बार्डिअर धावली. या लोकलच्या एकूण ९ फेऱ्या या मार्गावर धावणार आहेत. म्हणजेच एकूण बम्बार्डिअरच्या २१ फेऱ्या मध्य रेल्वेवर धावणार आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा