SHARE

चर्चगेट - 'परे'च्या सुरक्षेसाठी चर्चगेट येथे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी सेमिनार ठेवण्यात आले होते. हे सेमिनार कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक महिना राबवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल यांनी दिली. रेल्वेचे अपघात, तांत्रिक बिघाड होत असतात अशावेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी होते आणि याचा फायदा घेत चोऱ्या केल्या जातात. त्यामुळे रेल्वे प्रवास करताना कशी सावधानता बाळगावी यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्व:रक्षण हे प्रवाशांसाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे वेगवेगळ्या विभागातून हे अभियान राबवण्यात यावे असे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या