Advertisement

एसटीचं न्यू ईयर गिफ्ट! बोरीवली-मालवण शिवशाही बससेवा मंगळवारपासून


एसटीचं न्यू ईयर गिफ्ट! बोरीवली-मालवण शिवशाही बससेवा मंगळवारपासून
SHARES

मुंबई-कोल्हापूर अाणि मुंबई-गोवा या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या शिवशाही बससेवेला तुफान प्रतिसाद मिळत असल्याबद्दल अाता बोरीवली ते मालवण या सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. नववर्षात म्हणजेच मंगळवारपासून ही बससेवा सुरू होणार अाहे.


कोकणवासीयांसाठी नववर्षाची भेट

मुंबईतल्या प्रवाशांना थेट मालवणला जाण्यासाठी एसटी महामंडळानं बोरीवली ते मालवण ही शिवशाही बससेवा सुरू करण्याचे ठरवले असून सलग सुट्ट्यांच्या काळात कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बससेवा फायद्याची ठरणार अाहे. त्यामुळे शिवशाही बसला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात अाहे.


फक्त ६०० रुपये तिकीट

बोरीवली ते मालवण या मार्गाकरिता फक्त ६०० रुपये तिकीट दर अाकारण्यात येणार अाहे. वातानुकूलित अाणि अारामदायी अशा दोन बसेस एसटी महामंडळानं उपलब्ध करून दिल्या अाहेत.


कधी सुटणार बस?

बोरीवलीहून मालवणकरिता जाणारी ही बस बोरीवली येथून दररोज दुपारी ४.३० वाजता सुटणार असून पनवेल, रत्नागिरी, पावस, अाडिवरे, नाटे, जैतापूर पडेल कँटिन, जामसंडे कुणकेश्वर अाणि देवगडमार्गे मालवणला जाईल. तसंच मालवणहून दररोज संध्याकाळी ३ वाजता याचमार्गे परतीचा प्रवास सुरू होईल.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा