Advertisement

एसी लोकल सर्वेक्षणाला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

सर्वेक्षण घेण्यात आलं असून, यामध्ये एसी लोकलला अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

एसी लोकल सर्वेक्षणाला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
SHARES

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थंडगार व आरामदायी प्रवास करता यावा यासाठी एसी लोकल सूरू करण्यात आली. मात्र या एसी लोकलचे तिकीट हे अधिक असल्यामुळं प्रवाशांनी या प्रवासाला पाठ दाखवली आहे. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने या एसी लोकलबाबत सर्वेक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वेक्षण घेण्यात आलं असून, यामध्ये एसी लोकलला अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाड्यांना प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असतानाच आता त्याच्या सर्वेक्षणालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. साधारण २५ दिवसांत २० हजार ३०० प्रवाशांनी सर्वेक्षणात मत नोंदविल्याची माहिती समोर येत आहे.

पश्चिम रेल्वेववर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून आणि जानेवारी २०२१ पासून ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरही वातानुकू लित लोकल धावली. 

या तीनही मार्गावरील एसी लोकल गाड्यांना प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जादा भाडेदर आणि रद्द केलेल्या सर्वसामान्य लोकल फेऱ्या यामुळे प्रवाशांनी नाराजीच व्यक्त केली. जून २०२१ च्या तिसऱ्या आठवड्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली.

प्रवाशांना संपूर्ण एसी लोकल हवी की अर्ध वातानुकू लित लोकल, सामान्य लोकलच्या जागी वातानुकू लित लोकल चालवणे योग्य आहे का, वातानुकू लित लोकलच्या भाडेदरात सुधारणा आवश्यक आहे का असे अनेक प्रशद्ब्रा या सर्वेक्षणातून विचारण्यात आले आहेत. या ऑनलाइन सर्वेक्षणात जून २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाच हजार प्रवाशांनी मते नोंदविली होती. त्यानंतर बारा दिवसांत सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्यांची संख्या २० हजार ३०० झाली आहे. 

पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत ११ हजार ५०० आणि मध्य रेल्वेवरील ८ हजार ८०० प्रवाशांचे मत सर्वेक्षणात आजमावण्यात आले. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील दररोजची प्रवासी संख्या २० लाखांहून अधिक आहे. सर्वेक्षणात जास्तीत जास्त प्रवासी सहभागी होतील, अशी अपेक्षा रेल्वेला होती. परंतु तसे झाले नाही. सर्वेक्षण जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंतही पोहोचविण्यात रेल्वेला अपयशच आले. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा