ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ट्राफिक ब्लॉक

  Mumbai
  ट्रान्स हार्बर मार्गावर विशेष ट्राफिक ब्लॉक
  मुंबई  -  

  मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी, नेरुळ दरम्यान शनिवारी, 29 एप्रिल विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुपारी 12.35 ते 2.05 या वेळेत अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार असून, ठाणे-वाशी, पनवेल, नेरूळ दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

  ब्लाॅक दरम्यान रद्द झालेल्या फेऱ्या

  डाऊन मार्ग
  ठाणे ते वाशी - दु. 12.12, 12.40, 1.01, 1.25 आणि 1.57 वा.
  ठाणे ते नेरूळ - दु. 12.20, 1.10, 1.37 वा.
  ठाणे ते पनवेल - दु. 12.52, 1.18, 2.05 वा.

  अप मार्ग

  वाशी ते ठाणे - दु. 12.21, 12.49, 1.18, 1.40 आणि 2.02 वा.
  नेरूळ ते ठाणे - दु. 12.10, 12.31, 1 आणि 1.50 वा.
  पनवेल ते ठाणे - दु. 12.18, 1.04 वा.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.