Advertisement

मराठी नाट्य संमेलनासाठी विशेष रेल्वे गाड्या


मराठी नाट्य संमेलनासाठी विशेष रेल्वे गाड्या
SHARES

९८वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यसंकुल परिसरात होणार आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रवाशांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन दिवस प्रवाशांना या विशेष रेल्वे गाड्यांतून प्रवास करता येणार आहे.


संमेलनासाठी विशेष गाड्या

या संमेलनासाठी मध्ये रेल्वेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्या दि. १४ ,१५ आणि १६ जून रोजी ठाणे स्थानकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापर्यंत धावणार आहे. या रेल्वे गाड्या ठाणे स्थानकावरून दुपारी १.३५ वा. सुटणार तर, दुपारी १.४० वा. मुलुंड स्थानकावरून सुटतील आणि दुपारी २.३५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात पोहोचणार आहेत. या विशेष गाड्या सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा