Advertisement

India vs Pakistan मॅचसाठी मुंबईतून दोन विशेष वंदे भारत धावणार

पश्चिम रेल्वेचे भारत-पाकिस्तान सामन्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

India vs Pakistan मॅचसाठी मुंबईतून दोन विशेष वंदे भारत धावणार
SHARES

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून गुजरातमध्ये जाणाऱ्या क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने ‘मुंबई ते अहमदाबाद’ दोन विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन केले आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, १४ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणार आहे.

स्टेडियमची आसनक्षमता एक लाख ३२ हजार असून सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यामुळे मुंबई ते अहमदाबाददरम्यान सामन्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आणि सामन्याच्या दिवशी पहाटे अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन आहे.

तात्पुत्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना होईल आणि १४ ऑक्टोबरला पहाटे सहा वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल.

दुसरी विशेष एक्स्प्रेस मुंबईहून सामन्याच्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता सुटेल आणि १२ वाजेपर्यंत अहमदाबादला पोहोचेल. तूर्त गाड्यांचे थांबे निश्चित करण्यात आले नसले, तरी महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबई : पश्चिम रेल्वेवर 10 दिवसांचा ब्लॉक

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: 10 महिन्यांत पहिला माउंटन बोगदा तयार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा