Advertisement

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: 10 महिन्यांत पहिला माउंटन बोगदा तयार

5 ऑक्टोबर रोजी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी माउंटन बोगदा पूर्ण होणे, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) साठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: 10 महिन्यांत पहिला माउंटन बोगदा तयार
(Representational Image)
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( National High Speed Rail Corporation Limited) बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्तवाचा टप्पा पूर्ण केला आहे.

गुजरातमधील वलसाड येथील बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये पहिला माउंटन बोगदा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भांत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने माहिती दिली आहे. 

NHSRCLने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या 10 महिन्यांतच हा बोगदा तयार करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन याच बोगद्यातून जाणार असून मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणार आहे. बुलेट ट्रेनने मुंबई ते अहमदाबाद प्रवासांचा वेळ 127 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

माउंटन बोगदा गुजरातयेथील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील जरोली गावापासून जवळपास 1 किलोमीटर दूर आहे. हा बोगदा तयार करण्याचे काम न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM)ने केले आहे. या बोगद्याने बांधकाम करणे खूपच खडतर होते. बोगदा बनवण्यासाठी खूप विचारपूर्व व सर्व तांत्रिक प्रक्रिया वापरुन स्फोट करण्यात आले. हा बोगदा सह्याद्री पर्वतरांगादरम्यान तयार केला आहे. 

बुलेट ट्रेनच्या हा पहिल्या माउंटन बोगद्याची एकूण लांबी 350 मीटर इतकी आहे. तर 12.6 मीटर रुंदी आणि 10.25 मीटर उंच आहे. या बोगद्याचा आकार सिंगल ट्यूब हॉर्सप्रमाणे आहे. या बोगद्यात बुलेट ट्रेनचे दोन रूळ असतील. मुंबई आणि अहमदाबाद शहरांना जोडण्याचे काम हा बोगदा करतो.

NHSRCL नुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गंत बांधण्यात येणाऱ्या मार्गात डोंगराळ भागात सात बोगदे असणार आहेत. तर, एक बोगदा समुद्राखाली असेल. बुलेट ट्रेनचा समुद्राखालील  हा भारतातील पहिलाच बोगदा असणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाची अंदाजे किंमत 1.08 लाख कोटी इतकी आहे. 



हेही वाचा

मुंबई : मोनोरेलच्या वेळेत बदल, पहा नवे टाईमटेबल

MMRDA ठाण्यात मेट्रो लाइन 4 आणि 4A साठी डेपो बांधणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा