Advertisement

स्पाईसजेट करणार थेट आंतरराष्ट्रीय उड्डाण

स्पाईस जेटची मुंबई ते बँकॉक या मार्गावरील सेवा १७ मे पासून सुरू होणार आहे. तर कोलकाता, चेन्नई आणि वाराणसीची सेवा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

स्पाईसजेट करणार थेट आंतरराष्ट्रीय उड्डाण
SHARES

देशभरात सध्या जेट एअरवेजचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्यातच जेटच्या उड्डाणांवरही त्याचा परिणाम झाला आहे. अशातच स्पाईसजेटनं संधीचा फायदा घेत मुंबईवरून थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्याच्या अखेरपासून ही उड्डाणं सुरू होणार असून ८ ठिकाणी जेटच्या विमानांनी थेट प्रवास करता येणार आहे.


८ मार्गांची निवड

स्पाईस जेटनं सुरूवातीला ८ आंतरराष्ट्रीय ठिकाणांची निवड केली आहे. यामध्ये हाँगकाँग, कोलंबो, रियाध, बँकॉक, ढाका, काठमांडू, दुबई आणि जेद्दाह या ठिकाणांचा समावेश आहे. स्पाईस जेट ही देशात स्वस्त विमानसेवा देणारी कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये थेट सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांचा विचार केल्यास स्पाईस जेट ही पहिली स्वस्त विमानसेवा पुरवणारी कंपनी असल्याचं सांगण्यात येत आहे. या मार्गांसाठी कंपनी बोईंग 737 NG या विमानांचा वापर करणार आहे.

स्पाईस जेटची मुंबई ते बँकॉक या मार्गावरील सेवा १७ मे पासून सुरू होणार आहे. तर कोलकाता, चेन्नई आणि वाराणसीची सेवा १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.



हेही वाचा -

अंमलीपदार्थ तस्करांवर पहिल्यांदाच 'मकोका' अंतर्गत कारवाई

आमदाराची हरवलेली बॅग २४ तासात शोधली



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा