Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

एसटी बस कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवलं जबाबदार

दिवाळी सण तोंडावर असताना एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमिततेला कंटाळून जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एसटी कंडक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

एसटी बस कंडक्टरची आत्महत्या, ठाकरे सरकारला ठरवलं जबाबदार
SHARES

दिवाळी सण तोंडावर असताना एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमिततेला कंटाळून जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एसटी कंडक्टरने सोमवार ९ नोव्हेंबर २०२० गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येला एसटी महामंडळाची कार्यपद्धती आणि ठाकरे सरकारला दोषी ठरवलं आहे. यावरून आता राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

आधीच आर्थिक डबघाईला आलेलं एसटी महामंडळ कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे पुरतं गाळात गेलं आहे. दिवाळीचा बोनस दूरच राहिला, परंतु त्यांचे पगार देखील रखडलेले आहेत. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात देखील आर्थिक हलाखीत दिवस काढावे लागत आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच परप्रांतीयांना गावी पोहोचवण्याची मोठी कामगिरी एसटी कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्कारुन निभावली होती. तरीही ते अद्याप हक्काच्या पगारापासूनही वंचित आहेत. यामुळे मनोज चौधरी यांच्यासारख्या कर्मचाऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊन ठेपल्याचं त्यांचे सहकारी सांगत आहेत.


मनोज चौधरी जळगावमधील कुसुम्बा गावातील रहिवासी होते. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे (शिवसेना). माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी विमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असं मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

यावरून विरोधक आता ठाकरे सरकारला दोषी ठरवून टीका करू लागले आहेत. (st bus conductor from jalgaon commits suicide due to pending salary)


हेही वाचा-

अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा