Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल
SHARES

एसटी महामंडळाने देऊ केलेल्या वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून 'काम बंद' आंदोलन सुरू केलं. सरकारला कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शेकडो प्रवाशांचे हाल होत आहे. 





कोणतीही अधिकृत नोटीस नाही

कुठल्याही एसटी कर्मचारी संघटनेने अधिकृत नोटीस न देताच संप पुकारल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. त्यामुळे मुंबईतील परळ आणि मुंबई सेंट्रल या प्रमुख बस आगारातून एकही एसटी सकाळच्या वेळेस बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे आपापल्या गावी जाण्यास निघालेल्या प्रवाशांचे हाल या आंदोलनामुळे होऊ लागले. 



'या' ठिकाणी दगडफेक

परळ डेपो पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होतं. पण सकाळीच या ठिकाणी दगडफेक झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली. तर मुंबई सेंट्रल, पनवेल, ठाणे जिल्ह्यातील बस डेपोत बससेवा सुरळीत करण्यात आली.



परळ डेपोमध्ये मुंबई ते मुरुड एसटी अडवण्यात आली. त्यामुळे रायगड, महाडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना संपाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
- योगेश त्रिवेदी, प्रवासी


दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसताना हा संप पुकारण्यात आल्याने एसटी मंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.  



हेही वाचा-

कामबंद आंदोलन कर्मचाऱ्यांच्या अंगलट, पोलिसांकडून धरपकड सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा