एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6 लाखांचा विमा

 Mumbai
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6 लाखांचा विमा
Mumbai  -  

एसटी तोट्यात असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता कर्मचारी ठेव विमा योजनेअंतर्गत एसटीकडून 6 लाख 15 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच दिली. एसटी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही रक्कम 3 लाख 65 हजार एवढी होती. त्यात वाढ करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी एसटीतील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतन श्रेणी 3 वर्षांवरून 1 वर्ष करण्याचा निर्णय निर्णय नुकताच घेण्यात आला होता. या निर्णयामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता. एसटीमध्ये सध्या 1 लाखांहून अधिक कर्मचारी सेवेत आहेत.

Loading Comments