Advertisement

मुंबई-पुणे मार्गावर धावणार शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या

मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या नियमित फेऱ्या व्यतिरिक्त ३२ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

मुंबई-पुणे मार्गावर धावणार शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या
SHARES

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळं या मार्गावर धावणाऱ्या गाड्या १६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळं पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैस सोय होत आहे. त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांची प्रवासा दरम्यान गैर सोय होऊ नये यासाठी एसटीनं या मार्गावर जादा बस फेऱ्या सुरू केल्या असून, शिवनेरीच्या नियमित फेऱ्या व्यतिरिक्त ३२ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

रेल्वे रुळांवर दरड

मुंबईस राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळं कर्जत-लोणावळा दरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळली होती. मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं ती हटविण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळं मुंबई-पुणे मार्गावरील अनेक महत्त्वाचा गाड्या रेल्वे प्रशासनानं बंद केल्या आहेत

प्रवाशांची गैर सोय

दरम्यान, गाड्या बंद केल्यानं नियमित या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळानं या मार्गावर दोन्ही बाजूने (मुंबई-पुणे) दररोज शिवनेरीच्या जादा फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. तसंच, मागणीनुसार साध्या बसेस देखील या मार्गावर धावणार आहेत.



हेही वाचा -

१६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार पुणे-मुंबई रेल्वे सेवा

पूरामळं बेघर झालेल्या कुटुंबियांच्या मदतीला धावली गणेश मंडळं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा