Advertisement

पुरामळं बेघर झालेल्या कुटुंबियांच्या मदतीला धावली गणेश मंडळं

महाराष्ट्रातील काही भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळं बेघर झालेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मदतीचा हात पुढे केला आहे.

पुरामळं बेघर झालेल्या कुटुंबियांच्या मदतीला धावली गणेश मंडळं
SHARES

मुंबईसह राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर आणि सांगली यांसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाणी रस्त्यावर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला. तसंच, पाणी घराघरांत शिरल्यानं अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असून मोठं आर्थिक नुकसान झालं. अनेकांनी तब्बल २४ ते ४८ तास पाण्यात काढले. त्यामुळं पुरानं बाधित झालेल्या राज्यातील नागरिकांना प्रतिकुटुंब ५ हजार रुपये रोख रक्कम तातडीची मदत म्हणून देण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीची उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्री, राजकीय पक्ष यांच्यासह मुंबईसह उपनगरातील अनेक गणेश मंडळांनी देखील मदतीचा हात पुढं केला आहे.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

मुंबईसह उपनगरातील अनेक गणेश मंडळांनी विविध संकल्पनेतून मदतीचा हात पुढे केला आहे. नुकताच आगमन झालेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी म्हणजेच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर बेघर झालेल्या पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपये देण्याचं ठरविलं आहे. या मंडळानं अनोखा उपक्रम राबवला. आगमनाच्या सोहळ्यादरम्यान मिरवणुकीत ४ दानपेट्या ठेवल्या होत्या. तसंच, येणाऱ्या भाविकांना मदतीचं आवाहन केलं. या दानपेट्यांत जमा होणारी रक्कम देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

चिंचबंदर-डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (डोंगरीचा राजा)

चिंचबंदर-डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं (डोंगरीचा राजा) गणेश उत्सवात दानपेटीत जमा होणारी सर्व रक्क्म आपल्या महाराष्ट्रावर जी भीषण अशी पुरस्थिती निर्माण झाली आहे, त्याला मदत म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं जाहीर केलं आहे.

शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून प्रत्यक्ष पुरसदृश ठिकाणी जाऊन मंडळाच्या वतीनं रुपये १,००,०००/- किमतीचं शालेय व जिवनाश्यक वस्तूंचं वाटप १५ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात येणार आहे. मंडळानं हाती घेतलेल्या या सामाजिक उपक्रमामध्ये आपण देखील व्यक्तिशः सढळ हस्ते मदत करून पूरग्रस्तांना मदत करावी.

बाळगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ

पार्कसाईट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ट्रस्ट


यंदा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना राज्यातील काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं सार्वजनिक गणेश मंडळ मदतीसाठी सरसावली आहेत. काही मंडळं पैशाची मदत करत आहेत, तर काही मंडळ कपडे आणि खाण्या-पिण्याच्या वस्तूंची मदत करत आहेत. तसंच, या गणेश मंडळांनी मुंबईसह राज्यभरातील इतर मंडळांनाही मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे.



हेही वाचा -

Jio Fiber आलं, घरबसल्या बघा 'फर्स्ट डे फर्स्ट शो'!

दहीहंडीच्या आयोजकांना काढावा लागणार आता 'स्पॉट विमा'




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा