Advertisement

Jio Fiber आलं, घरबसल्या बघा 'फर्स्ट डे फर्स्ट शो'!

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी मुंबईत झाली. यावेळी 'प्रकाशाच्या वेगाचा स्पीड' अशा शब्दात मुकेश अंबानी यांनी जिओ फायबर लाँचची घोषणा केली.

Jio Fiber आलं, घरबसल्या बघा 'फर्स्ट डे फर्स्ट शो'!
SHARES

रिलायन्सच्या बहुप्रतिक्षीत जिओ फायबर सेवेची घोषणा सोमवारी रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली. ५ सप्टेंबरला जिओचा तिसरा वर्धापनदिन असून याच दिवशी जिओ फायबर लाँच करण्यात येणार आहे. जिओ फायबरमध्ये १०० एमबीपीएसपासून १ जीबीपीएसपर्यंतचा अफाट इंटरनेटचा स्पीड ग्राहकांना मिळणार आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीज (reliance industries)ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) सोमवारी मुंबईत झाली. यावेळी  'प्रकाशाच्या वेगाचा स्पीड' अशा शब्दात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी जिओ फायबर (Jio fiber)च्या लाँचची घोषणा केली. यामधील प्लॅन्स ७०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत.

यावेळी अंबानी म्हणाले की, मागील वर्षभरात जिओने मोठी भरारी घेतली आहे. जिओनं बाजारपेठेचा ३२ टक्के हिस्सा काबीज करून ३४ कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे. जिओ जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी  डिजिटल सर्विस कंपनी आहे. आम्ही भारतातील सर्वाधिक कर भरणारेही असून यावर्षी १२ हजार १९१ कोटी रुपयांचा कर आम्ही भरला आहे. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केलं असून जिओ फायबरमुळे तुम्हाला प्रकाशाच्या वेगाचा ब्रॉडबँड (Broadband) स्पीड मिळेल. याव्यतिरीक्त अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा मिळतील, असंही यावेळी मुकेश अंबानी यांनी म्हटलं. 


जिओफायबरची वैशिष्ट्ये:

  • जिओ फायबरचा स्पीड १०० एमबीपीएसपासून १ जीबीपीएसपर्यंत आहे.
  • प्रति महिना ७०० रु. ते १० हजार रुपयांचे प्लान्स असणार आहेत. 
  • जीओ गिगाफायबरवर केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि नवे सिनेमे पहता येणार आहेत. 
  • सिनेमा थिएटरमध्ये ज्या दिवशी प्रदर्शित होईल त्याच दिवशी तो पाहता येणार
  • जिओची ही सिनेमाची फर्स्ट डे फर्स्ट शो  योजना २०२० च्या मध्यापासून सुरू होणार 
  • रिलायन्सने एमआर (MR) नावाचा डिव्हाइस आणला आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन कपडे परिधान करू शकता.
  • जिओ गिगाफायबर या ब्राँडब्रँड सेवेत राऊटर, सेट टाॅप बाॅक्स आणि स्मार्ट होम सेवा मिळणार आहेत.
  • ब्राँडब्रँड सेवा इन्स्टाॅल करण्यास फक्त १ तासाचा वेळ लागणार आहे. 
  • जीओ गिगा टीव्हीमार्फत ग्राहकांना व्हिडिओ काॅलिंगही करता येणार आहे. 
  • केबल टीव्हीसाठी जिओ सेट टाॅप बाँक्स लाँच
  • जिओ गिगाफायबरद्वारे व्हिडीओ काॅन्फरन्सिंगही करता येणार





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा