Advertisement

वकिलांना तिसर्‍यांदा लोकल प्रवासासाठी मुदतवाढ

राज्य सरकारच्या विनंतीनंतर वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचार्यांना तिसर्‍यांदा लोकल प्रवासाची मुभा वाढून देण्यात आली आहे.

वकिलांना तिसर्‍यांदा लोकल प्रवासासाठी मुदतवाढ
SHARES

राज्य सरकारच्या विनंतीनंतर वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचार्यांना तिसर्‍यांदा लोकल प्रवासाची मुभा वाढून देण्यात आली आहे. यापूर्वी १ डिसेंबर पर्यंत वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील आदेश मिळेपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारनं २३ नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवासाला मुभा देण्यात आली होती. मात्र, २३ नोव्हेंबरला हा कालावधी संपल्यानं राज्य सरकारनं १ डिसेंबरपर्यंत वकिलांना  लोकल प्रवासात मुभा वाढून दिली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा राज्य सरकारनं वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या मागणीवरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. 

या मुदतवाढीत तारीख निश्चित केले नसल्याने वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण बैठक पुढल्या आठवड्याच्या शेवटी होणार आहे. तो पर्यंत कोविडचा आढावा घेऊन या बैठकीत लोकल सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आहे. कोविड नियंत्रणात असल्यास १५ डिसेंबरनंतर लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारही होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय