Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत पास


वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत पास
SHARES

एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी नेहमीच विविध योजना राबवते. यामध्ये ज्येष्ठ व्यक्ती, विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात सवलत, आवडेल तिथं प्रवास अशा योजनांचा समावेश आहे. यापुढे जाऊन सामाजिक भान राखत एसटी महामंडळाने आता शहीद जवानांच्या पत्नींसाठी आजीवन मोफत एसटी पास देण्याची योजना सुरू केली आहे.


६३९ वीरपत्नींना पास

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना' असं या योजनेचं नाव आहे. याअंतर्गत एसटी महामंडळाकडून मुंबईतील १२ वीरपत्नींना आजीवन मोफत पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर राज्यभरात ६३९ वीरपत्नींना असे पास देण्यात आल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं.


'एसटी'चा पुढाकार

मुंबईसह, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर यासारख्या महाराष्ट्रातील ३१ शहरातील ६३९ वीरपत्नींना हे आजीवन मोफत एसटी प्रवासाचे पास देण्यात आले आहेत. अशा प्रकारे शहिदांचा सन्मान करणारे महाराष्ट्र राज्य मागे परिवहन महामंडळ ही एकमेव प्राधिकरण असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलं आहे.हेही वाचा-

गणपतीसाठी पश्चिम रेल्वेची विशेष ट्रेन

बेस्टचा तोटा १८०० कोटींवरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा