Advertisement

५०शी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छासेवानिवृत्ती योजना

वयाची ५०शी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छासेवानिवृत्ती घ्यावी, यासाठी महामंडळानं तयारी सुरू केली आहे.

५०शी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छासेवानिवृत्ती योजना
SHARES

वयाची ५०शी गाठलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छासेवानिवृत्ती घ्यावी, यासाठी महामंडळानं तयारी सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेतलं जाणार आहे. त्यांनी होकार द्यावा याकरिता समन्वयाची जबाबदारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या परिपत्रकामुळं महामंडळाच्या २७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

महामंडळ स्वेच्छासेवानिवृत्ती योजना राबविणार असल्याची हवा मागील काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ८ डिसेंबर रोजी महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी परिपत्रक जारी केलं आहे. हे परिपत्रक विभाग, आगार, घटक स्तरावील सूचना फलकांवर लावले जाणार आहे.

५० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना योजना समजावून सांगितली जाणार आहे. संमतीपत्र भरून दिलं म्हणजे त्यांची स्वेच्छासेवानिवृत्ती मंजूर झाली, असे समजण्यात येऊ नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये मतप्रवाह

  • या योजनेविषयी कर्मचाऱ्यांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. 
  • स्वेच्छासेवानिवृत्ती घेतल्यानंतर पगार बंद होईल. 
  • गरजेच्या वेळी कुठल्याही संस्थेकडून कर्ज उपलब्ध होणार नाही. 
  • पेन्शन नसल्यानं मिळालेल्या पैशांतूनच खर्च करावा लागेल. 
  • घरातील कार्यप्रसंग, शिक्षण करण्याची जबाबदारी याच वयात पार पाडावी लागते. 
  • अशा वेळी योजना स्वीकारायची की नाकारायची याविषयी वेगवेगळी मते मांडली जात आहेत.

अशी आहे योजना 

  • अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३० जूनपर्यंत वयाची ५० वर्षे पूर्ण असावीत. 
  • काम केलेल्या प्रत्येक वर्षासाठी तीन महिन्यांचे वेतन मिळेल.
  • मूळ वेतन व महागाई भत्त्याचा समावेश. 
  • नियमित सेवानिवृत्तीनंतरचे लाभ नियमानुसार मिळणार.
  • मोफत कौटुंबिक पासची योजना लागू 
  • स्वेच्छानिवृत्ती मंजूर/नामंजूर करण्याचे अधिकार महामंडळाकडं असतील. 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा