Advertisement

रेल्वे ट्रॅकवरून चालताना चार महिन्याचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं

अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ दोन तास थांबली होती त्यावेळी ही घटना घडली.

रेल्वे ट्रॅकवरून चालताना चार महिन्याचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं
SHARES

मुंबई ते कल्याण (Mumbia Local CSMT To Kalyan) मार्गावर चालणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. अशात ठाकुर्लीनजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे.

अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ (Ambernath Local News) दोन तास थांबली असता एक महिला तिच्या चार महिन्याचे बाळ आणि तिच्या काकासह रेल्वे ट्रॅकवर उतरली. त्यावेळी त्या काकाच्या हातून बाळ निसटलं आणि ते वाहत्या पाण्यात पडलं. आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वे थांबल्यानंतर बाळाची आई लोकलमधून उतरली आणि ही दुर्दैवी घटना घडली.

लोकल दोन तास थांबल्यानंतर ती आई तिच्या काकासह खाली उतरली. त्यावेळी तिच्या काकाच्या हातातून ते चार महिन्याचं बाळ निसटलं आणि बाजूला असलेल्या नाल्यातील वाहत्या पाण्यात पडलं. 

या ठिकाणी कल्याण लोहमार्ग पोलिस दाखल झाले असून त्यांनी शोध सुरू केला आहे. हा नाला ज्या ठिकाणी आहे तो नाला पुढे जाऊन खाडीला मिळतो. त्यामुळे अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. 

लोकल ज्या ठिकाणी थांबली होती त्याच्या बाजूला नाला होता. या नाल्यावरून लहान खांबावरून चालताना हे बाळ निसटल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रवाशांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

मुंबईसह ठाण्यात बुधवारीही मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा