Advertisement

taxi-auto fares: मुंबईकरांवर रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीची मार?

राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत असताना मुंबईकरांवर महागाईची मार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

taxi-auto fares: मुंबईकरांवर रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीची मार?
SHARES

राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत असताना मुंबईकरांवर महागाईची मार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एका बाजूला सर्वसामान्यांसाठी मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन बंद असताना, शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी (taxi and auto fares may be hiked by Rs 2-3 in mumbai) किमान भाड्यात २ ते ३ रुपयांनी वाढ करण्याचं ठरवलं आहे.

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणनं (MMRTA) या दरवाढीला हिरवा कंदील दाखवल्याचं म्हटलं जात आहे. खटुआ समितीने सादर केलेल्या अहवालाच्या शिफारशीनुसार आरटीओ, ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन यांनी एकमताने दरवाढीचा आकडा ठरवल्यानंतर एमएमआरटीए रिक्षा-टॅक्सींच्या नवीन भाडेसूत्राच्या शिफारसीला मंजुरी देईल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाड्यात २ ते ३ रुपयांपर्यंत भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - सामान्य प्रवाशांसाठी लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद; लांब पल्ल्यांच्या नियमित गाड्याही रद्द

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये रिक्षा-टॅक्सी अडीच महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. या दरम्यान रिक्षा-टॅक्सी चालकांचं उत्पन्नही ठप्प झालं होतं. हातावर पोट असलेल्या या चालकांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. काही चालकांच्या रिक्षा-टॅक्सीच्या कर्जाचे हप्ते थकले, तर काही जणांकडील शिलकीची रक्कमही खर्च झाली. अशा स्थितीत झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे.

लाॅकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दुकाने, बाजारपेठा सम-विषम पद्धतीने पूर्ण क्षमतेने चालवण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. व्यवसाय, उद्योगधंदे चालवणारे, नोकरदार, कर्मचाऱ्यांना आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी जाणं-येणं सोईचं व्हावं म्हणून मुंबई महानगर परिसरात प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. परंतु अद्याप सर्वांसाठी लोकल ट्रेनची सेवा सुरू न झाल्यामुळे बहुतांश कर्मचारी खासगी वाहन किंवा रिक्षा-टॅक्सीनेच प्रवास करत आहेत. त्यातही रिक्षा-टॅक्सी चालकांना मर्यादीत प्रवाशांसह चालवण्यास परवानगी दिली आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा