Advertisement

Best workers: बेस्टच्या तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांना चार्जशीट


Best workers: बेस्टच्या तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांना चार्जशीट
SHARES

लॉकडाऊनच्या काळात बेस्ट प्रशासन अत्यावशक्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवत होतं. अनेक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत होते. आपलं कर्तव्य बजावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी बेस्टच्या गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलवणं धाडलं. परंतु, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं अखेरचा पर्याय म्हणून बेस्टनं तब्बल ४ हजार २११ कर्मचाऱ्यांना चार्जशीट दिली आहे.

लॉकडाउन कालावधीत ड्युटीवर येऊ न शकलेल्या बेस्ट उपक्रमातील ४ हजार २११ कर्मचाऱ्यांना बेस्टने चार्जशीट दिली आहे. बेस्टनं सद्यस्थितीत परिवहन विभागातील कामगारांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. बडतर्फ केलेल्या कामगारांची संख्या १४ वर पोहोचली आहे. अनुपस्थित कामगारांना चार्जशीट देण्यास सुरुवात केल्यानंतर विविध विभागातील सुमारे ५०० कामगार सेवेत हजर झाल्याचं समजतं. लॉकडाउनमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळं बेस्टकडून दररोज १८०० पर्यंत बस चालविण्यात आल्या. ही संख्या हळुहळू वाढविण्यात आल्यानं प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

उपक्रमाने परिवहन विभागातील २,८९७ कामगारांना चार्जशीट दिली आहे. त्यानंतर विद्युत विभागासह इतर विभागातही चार्जशीट देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या तरी कारवाईची सर्वात झळ चालक, कंडक्टरांना सहन करावी लागत आहे.

मुंबई महानगर परिसरात लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची सेवा देण्यात आली. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे ३,५०० पैकी २,५०० बसगाड्या चालवण्यात येत होत्या. कर्तव्यावर उपस्थित राहण्यासाठी वारंवार बोलावूनही कर्मचारी गैरहजर राहत असल्याने बेस्ट उपक्रमाकडून कारवाई म्हणून काही कर्मचाऱ्यांना चार्जशीट देण्यास सुरुवात केली. 

चार्जशीट दिलेले कर्मचारी

विभाग
चार्जशीट
परिवहन
२,८९७
विद्युत
७२३
अभियांत्रिकी
५६८
सुरक्षा
२२
प्रशासन

               


हेही वाचा -

Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

सामान्य प्रवाशांसाठी लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद; लांब पल्ल्यांच्या नियमित गाड्याही रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा