Advertisement

ठाणे महापालिका परिवहनच्या बसेस डोंबिवली आणि नवी मुंबईतही धावणार

प्रवाशांची वाढती मागणी पाहता ठाणे महापालिका परिवहन याबाबत विचार करत आहे

ठाणे महापालिका परिवहनच्या बसेस डोंबिवली आणि नवी मुंबईतही धावणार
SHARES

प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका परिवहन लवकरच शेजारच्या डोंबिवली आणि नवी मुंबई भागात आपले नेटवर्क वाढवण्याच्या विचारात आहे. प्रवाशांची वाढती मागणी पाहता ठाणे महापालिका परिवहन याबाबत विचार करत आहे.

टीएमटीने आपल्या ताफ्यात ३१ नवीन बसेस समाविष्ट केल्या आहेत. या 31 बसेसपैकी 20 सीएनजी बसेस आणि 11 इलेक्ट्रिक बसेस आहेत. नवीन बसेसपैकी, प्रशासनाने दिवा-डोंबिवली आणि वाशी मार्गांव्यतिरिक्त घोडबंदर मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर पाच ई-एसी बसेस चालवण्यास सुरुवात केली आहे.

यासोबतच ठाणे महापालिका परिवहन आगामी काळात आपल्या ताफ्यात आणखी बसेसचा समावेश करू शकते आणि प्रवाशांच्या संख्येनुसार त्या वेगवेगळ्या भागात सुरू करण्याची योजना आहे. त्यापैकी डोंबिवली आणि ठाणे या भागांचा सहभाग आहे. कारण ठाण्यातून बरेच प्रवासी डोंबिवली आणि नवी मुंबई इथे कामाला जातात. त्यांना सोईस्कर व्हावे यासाठी या मार्गांवर बसेस सुरू केल्या जाऊ शकतात. 



हेही वाचा

ठाणे महापालिका डबल डेकर ई-बस चालवण्याच्या तयारीत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा