Advertisement

11 आणि 12 जुलैला कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

कोकण रेल्वेवरील 6 गाड्यांच्या शेड्यूलवर परिणाम झाला आहे.

11 आणि 12 जुलैला कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
SHARES

कोकण रेल्वे मार्गावर 11 आमि 12 जुलैला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण सहा गाड्यांच्या शेड्यूलवर याचा परिणाम होणार आहे. देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. संगमेश्वर ते भोके दरम्यान 11 जुलै रोजी, तर कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या देखभालीसाठी 12 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

11 जुलै रोजी संगमेश्वर ते भाके दरम्यान सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत हा मेगाब्लाक घेण्यात येणार आहे. या तीन तासात तिरुनेलवेली-जामनगर ही 10 जुलै रोजी प्रवास सुरू करणारी एक्स्प्रेस ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान अडीच तास थांबवून ठेवली जाणार आहे.

तर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनन्स नेत्रावती एक्स्प्रेस कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान तासभर थांबवून ठेवली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

कुडाळ ते वेर्णा या स्थानकांदरम्यान 12 जुलैला सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या तीन तासामध्ये चार गाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यात मुंबई सीएसएमटी - मडगाव ही जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थिवीम स्थानकावर तीन तास थांबवली जाणार आहे.

तर हजरत निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास थांबवली जाणार आहे. तसंच दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस रोहा ते कणकवली जरम्यान 50 मिनिटं रोखली जाणार आहे. तर तिरुअनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटं रोखून ठेवली जाणार आहे. या दोन दिवसांच्या मेगाब्लॉकदरम्यान सहा गाड्यांच्या वेळापत्रकारव त्याचा परिणाम होणार आहे.



हेही वाचा

आता भगव्या रंगात दिसणार वंदे भारत एक्स्प्रेस

सर्वसामान्यांना दिलासा! रेल्वेची २५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा