Advertisement

वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचं स्थानक


वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचं स्थानक
SHARES

अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या टर्मिनससाठी बीकेसीतील जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे महामंडळाला हस्तांतरीत करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालय, राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राज्य सरकारकडून या बुलेट ट्रेनच्या कामांना गती देण्यात येत आहे. या प्रकल्पात वांद्रे-कुर्ला संकुल येथे स्थानक होणार असून, त्यासाठी लागणाऱ्या जमिनींचे कागदपत्र रेल्वेला हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी आयोजित करण्यात आला.

एमएमआरडीएचे संचालक यू. पी. एस. मदान यांनी नॅशनल हायस्पीड रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आचल खरे यांच्याकडे जमिनीचं हस्तांतरण करण्यात आले. यावेळी जपानचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.


वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचं स्थानक

प्रकल्पात वांद्रे-कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनचे भूमिगत तीन मजली स्थानक होणार आहे. भूमिगत स्थानकासाठी ४.६ हेक्टर जागा लागेल. तर, त्यावरील जागेत होणाऱ्या अन्य कामांसाठी ०.९ हेक्टर जागा लागणार असल्याचं सांगण्यात आलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं बांधकाम २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. मुंबई - अहमदाबाद रेल्वेमार्गावर १६२ किलोमीटर पूल आणि २७.०१ किलोमीटरचे ११ बोगदे असणार आहेत.


या मार्गावरूनही सुरू होणार बुलेट ट्रेन

या मार्गावर एकूण १२ स्टेशन्स असतील. ज्यामध्ये सुरत आणि बडोदा येथे दोन - दोन मिनिटांचे थांबे असणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च एक लाख आठ हजार कोटी असून ४६८ किलोमीटर उन्नत मार्ग असणार आहेत. या योजनेमध्ये डिझाइन आणि लिलावाची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण केली जाईल. तसंच भविष्यामध्ये दिल्ली-अमृतसर, बंगळूरु - हैदराबाद, जयपूर-दिल्ली, बनारस-अलाहबाद, बनारस-लखनौ अशा मार्गांवरही बुलेट ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.


कशी असेल ही बुलेट ट्रेन?

पुणे-मुंबई-अहमदाबाद अंतर ६५० किलोमीटर असून, ही बुलेट ट्रेन ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणार आहे. हा प्रकल्प जमिनीपासून सुमारे चार फूट उंचीवर (एलिव्हेटेड) असून, काही ठिकाणी ती अंडरग्राऊंड (जमिनीखालून) देखील करण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ मुंबई-अहमदाबाद अशी असणारी बुलेट ट्रेन भविष्यात पुणे-मुंबई-अहमदाबाद-साबरमती अशी धावणार असून, साबरमती हे शेवटचं स्थानक असणार आहे. 

तर, मुंबई-पुणे ही बुलेट ट्रेन वडाळा मार्गे धावणार असून, पुण्याहून मुंबईला केवळ अर्ध्या तासात पोहोचता येणं सहज शक्य होणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ठाणे, विरार, बोईसर, वापी, सुरत, वडोदरा येथे या गाडीला थांबा देण्यात येईल. तसंच, गुजरातमधील वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानके असणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा