Advertisement

मध्य रेल्वेवर ६ तारखेपासून दाखल होणार तिसरी बम्बार्डिअर


मध्य रेल्वेवर ६ तारखेपासून दाखल होणार तिसरी बम्बार्डिअर
SHARES

मध्य रेल्वेवर ६ जानेवारीपासून तिसरी बम्बार्डिअर लोकल ट्रेन धावणार आहे. या गाडीच्या १३ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवर बम्बार्डिअर लोकलच्या एकूण ३४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेला आतापर्यंत २ बम्बार्डिअर लोकल मिळाल्या असून या २ लोकलच्या एकूण २१ फेऱ्या चालवण्यात येत आहेत. तर तिसऱ्या बम्बार्डिअर लोकलच्या १३ फेऱ्या होणार असल्याने मध्य रेल्वेवर बम्बर्डिअरच्या एकूण ३४ फेऱ्या होणार आहेत.


फेऱ्या अशा असतील

पहिली फेरी विद्याविहारहून स. ५.३९ वा.सुटून कल्याणला स.६.३५ वा.पोहोचेल. दुसरी फेरी कल्याणहून स.६.४८ वा.सुटून दादरला ८ वा. पोहोचेल. तिसरी फेरी दादर स.८.०७ वा. सुटून ठाण्याला ९.१६वा. पोहोचेल. चौथी फेरी कल्याणवरून स.९.२२ वा. सुटून स.१०.५२वा. सीएसएमटीला पोहोचेल. पाचवी फेरी सीएसएमटीहून स.१०.५६ वा. सुटून कुर्ला स. ११.२६ वा. पोहोचेल. सहावी फेरी कुर्ल्याहून सायं.४.३६ वा. सुटून सीएसएमटीला सायं. ५.०८वा. पोहोचेल.
तर, सातवी फेरी सीएसएमटीहून सायं. ५.१२ वा. सुटून कल्याणला सायं.६.४२ वा. पोहोचेल. आठवी फेरी कल्याणहून सायं. ६.५१ वा. सुटून सीएसएमटीला रात्री ८.१८ वा. पोहोचेल. नववी फेरी सीएसएमटीहून रा. ८.२२ वा. सुटून रा. ९.४० वा. डोंबिवलीला पोहचणार आहे. दहावी फेरी डोंबिवलीहून रात्री ९.५९ वाजता सुटून सीएसएमटीला रात्री ११.१९ वाजता पोहोचणार तर शेवटीची अकरावी फेरी रात्री ११.२५ वा. सुटून कुर्ल्याला रात्री ११.५३ वाजता पोहोचेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा