Advertisement

दादर-माटुंग्या दरम्यान अपघात, एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून उतरले

दादर-माटुंगा दरम्यान एक्स्प्रेसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

दादर-माटुंग्या दरम्यान अपघात, एक्स्प्रेसचे ३ डबे रुळावरून उतरले
SHARES

दादर-माटुंगा दरम्यान एक्स्प्रेसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. दादर-पॉन्डिचेरी (Dadar-Pondicherry) या लांब पल्ल्याच्या गाडीचे मागचे तीन डबे रेल्वे रुळावरुन (Derail) घसरले आहेत. आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी (No causalities) झालेली नाही.

नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली. गाडी नंबर ११००५ असा या गाडीचा नंबर आहे. दरम्यान, सुरुवातीला दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली. त्यानंतर हादरे बसल्यामुळे दोन्ही गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या. या घटनेनंतर मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

गदक एक्स्प्रेस आणि पॉन्डिचेरी एक्स्प्रेस या दोन्हीही गाड्या एकाच ठिकाणी एकाच ट्रॅकवर येत असताना ही घटना घडल्याचं म्हटलं जातंय. पॉन्डिचेरी एक्स्प्रेसचे दोन डेब इंजिनची धडक बसून रुळावरुन खाली घसरले.

रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातो. दरम्यान, वेग दोन्ही गाड्यांचा फार कमी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. तीन ते चार वेळा शॉर्ट सर्किट झालं. दरम्यान, ही धडक झाल्यानंतर प्रवाशांनीही तातडीनं गाडीतून खाली उतरत बाहेर येण्याचा प्रयत्न केला.

ही घटना कळल्यानंतर तातडीनं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाहीरी घटनास्थळी दाखल झाले. सध्या या मार्गावरली वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा