गोरेगावच्या पादचारी पुलाला छप्परच नाही

 Goregaon
गोरेगावच्या पादचारी पुलाला छप्परच नाही

गोरेगाव - रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाला गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रे नाहीत. याचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहेे. हा पादचारी पूल दुरुस्ती करुन दोन महिने झाले. रेल्वेने लाद्या, पायऱ्या यांची डागडुगी डिसेंबर महिन्यात पूर्ण केली. पण, पुलाला पत्र्यांचे छप्पर लावण्याचं काम अजून झालेलं नाही.

याबाबत स्टेशन मास्तर नितीन बगडे यांनी पुलाचे काम करणाऱ्या अभियंत्यांंना वारंवार फोन केला पण, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, या पुलाच्या अर्धवट झालेल्या कामावर स्थानिक कुमार शेट्टी यांनी रोष व्यक्त केला आहे.

Loading Comments