Advertisement

मध्य रेल्वे मार्गावर रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत

मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत
SHARES

मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते विद्याविहार स्थानकांदरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे वाहतूक उशिराने सुरू असून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद गाड्यांवारही याचा परिणाम झाला आहे.


प्रवासी त्रस्त

मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. काही दिवसांपूर्वी हार्बर रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता.


हेही वाचा - 

धक्कादायक! गेल्या ५ वर्षांत रेल्वे ट्रॅकवर १८, ४२३ जणांचा बळी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा