पादचारी पुलांवरील गर्डर उभारणं आणि सब-वेच्या कामासाठी कल्याण ते कसारा विभागात १३ मार्चच्या मध्यरात्रीपासून ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. १३ मार्चच्या मध्यरात्री २ ते १४ मार्चच्या सकाळी ७.२५ पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे काही उपनगरीय लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
खडवली आणि वासिंद स्थानकांदरम्यान आणि आसनगाव ते आटगाव स्थानकांदरम्यान असलेले लेव्हल क्रॉसिंग बंद करून तेथे भुयारी मार्ग बनवण्यात येणार आहे. या भुयारी मार्गावरही गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार आहे. याशिवाय शहाड स्थानकात पादचारी पुलाच गर्डर बसविण्यासाठी कामं हाती घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
उपनगरी लोकलच्या वेळापत्रकात बदल
रद्द करण्यात आलेल्या विशेष गाड्या
विलंबानं धावणार
१३ मार्चला सुटणारी गाडी क्र मांक ०१२३७ नागपूर ते मडगाव, गाडी क्रमांक ०२६१८ हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम, गाडी क्रमांक ०२१९० नागपूर ते सीएसएमटी गाडी इगतपुरी ते कल्याण स्थानकांदरम्यान एक तास ते तीन तासपर्यंत थांबविण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचतील.
विशेष थांबा
१४ मार्चला सुटणारी गाडी क्रमांक ०२२५९ सीएसएमटी ते हावडा-हावडा गाडी क्रमांक ०२१२९ एलटीटी ते प्रयागराज, गाडी क्रमांक ०५०१७ एलटीटी ते गोरखपूर आणि १३ मार्चला सुटणारी गाडी क्रमांक ०१२३६ मडगाव- नागपूर विशेष कल्याण व टिटवाळादरम्यान आणि निळजे स्थानकांवर थांबविण्यात येतील. शिवाय १३ मार्चला सुटणारी गाडी क्रमांक ०२११२ अमरावती ते सीएसएमटी अमरावतीहून ३ तास उशिरानं सोडण्यात येईल.