Advertisement

रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांच्या जनजागृतीसोबत नियमसक्तीची गरज

मुंबईसह देशभरात होणाऱ्या अपघातांच्या (Accidents) संख्येत वाढ होत चालली आहे.

रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांच्या जनजागृतीसोबत नियमसक्तीची गरज
SHARES

मुंबईसह देशभरात होणाऱ्या अपघातांच्या (Accidents) संख्येत वाढ होत चालली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात हे वाहतूक नियम (Traffic Rules) मोडल्यानं होत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियम जनजागृतीसोबत (Awareness) त्या नियमांच्या सक्तीवर भर देणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

राज्यात (Maharashtra) अपघात कमी करण्यासाठी प्रशासनासह विविध स्वयंसेवी संस्थांकडून वाहतूक नियम (Traffic Rules) जनजागृतीवर भर दिला जातो. पण तरीही अपघातांचं (Accidents) सत्र कायम आहे. राज्यात मागील वर्षभरात ३२,८७६ रस्ते अपघात झाले. त्यामध्ये १२,५६५ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचं प्रमुख कारण वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि वेगात वाहनं चालविणं हे आहे. त्यामुळं वेगानं वाहन चालवणाऱ्यांसह नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे.

अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची जनजागृती करणं आवश्यक आहे. पण त्याला काही मर्यादा हव्यात. प्रादेशिक परिवहन विभाग (RTO), पोलीस, शिक्षण खाते, सामाजिक संस्था नेहमी जनजागृतीवर भर देतात. पण केवळ जनजागृतीमुळं लोकांना शिस्त लागत नाही. त्यामुळं जनजागृतीला कारवाईची जोड द्यायला हवी.

रस्ते अपघात

  • ४,६९,४१८ इतके अपघात २०१८ साली संपूर्ण देशात झाले.
  • १,५१,४१७ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला.
  • १,०६,३५२ जणांचा मृत्यू वेगानं किंवा विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यानं झाला.
  • ४३,६१६ जण हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्युमुखी पडले.
  • २४,४३५ इतके मृत्यू सीटबेल्टचा वापर न केल्यामुळं झाल्याचं दिसून आलं आहे.



हेही वाचा -

...तर फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करणार - अनिल देशमुख

मुंबईचा 'वी अनबिटेबल' अमेरिकाज गॉट टॅलेंटमध्ये सर्वोत्तम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा