Advertisement

घरचा आहेर! रावते म्हणतात, 'युनियन्समुळे बेस्ट तोट्यात'!

बेस्टच्या काही विभागात कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांची दुसऱ्या विभागात बदली करायची असेल, तर युनियन्सची परवानगी घ्यावी लागते. मात्र, युनियन्सच्या हट्टीपणामुळे बेस्ट प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकत नसल्यानेच ही वेळ बेस्टवर आल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना म्हणाले.

घरचा आहेर! रावते म्हणतात, 'युनियन्समुळे बेस्ट तोट्यात'!
SHARES

बेस्ट प्रशासन कर्मचारी संघटनांच्या हट्टीपणामुळे तोट्यात जात असल्याची प्रतिक्रिया देत शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महापालिकेतील सेना नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. आज घडीला बेस्टला कर्ज काढून कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागत आहे. बेस्टच्या काही विभागात कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांची दुसऱ्या विभागात बदली करायची असेल, तर युनियन्सची परवानगी घ्यावी लागते. मात्र, युनियन्सच्या हट्टीपणामुळे बेस्ट प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकत नसल्यानेच ही वेळ बेस्टवर आल्याचंही रावते 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना म्हणाले.


नेमकी कुणाची युनियन हट्टी?

बेस्टमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना आणि मनसे आणि भाजपाच्या संघटनांचा समावेश आहे. त्यातील बेस्ट कामगार सेना ही शिवसेनेची असून, त्याच्या कमिटीमध्ये शिवसेनेचे दोन पदाधिकारी होते. त्यातील एक पदाधिकारी भाजपामध्ये गेला असून, एक पदाधिकारी अजून कमिटीमध्ये आहे. त्यातच विद्यमान बेस्ट समिती अध्यक्ष हे देखील या युनियनचे पदाधिकारी होते. त्यामुळे याच पदाधिकाऱ्यामुळे बेस्ट तोट्यात गेली असं तर रावतेंना म्हणायचं नसेल ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


काय म्हणाले होते आयुक्त...

सध्या बँकांकडून कर्ज घेऊन कामगारांचा पगार दिला जात आहे. इंधनासह इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. उद्या या सर्वांनी हात वर केल्यास बेस्ट उपक्रमही बंद करावा लागेल. अशा परिस्थितीत मी काय पर्याय देऊ? अशी हतबलता महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्ट उपक्रमाचा लेखा जोखा मांडताने व्यक्त केली होती. त्यामुळे बेस्ट वाचवणं कठीण असल्याचा इशाराही आयुक्तांनी दिला होता.हेही वाचा-

तर, 'बेस्ट' कायमची बंद करावी लागेल, महापालिका आयुक्तांची हतबलता

'या' कारणांमुळे बेस्ट उपक्रम तोट्यात


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा