Advertisement

मेट्रो २ए आणि मेट्रो ७ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबईत सोमवारी मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु झाली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होणार आहे.

मेट्रो २ए आणि मेट्रो ७ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवला हिरवा झेंडा
SHARES

मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या मार्गांवरील प्रवासासाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण आता या मार्गावर ही मेट्रोची (mumbai metro) चाचणी सुरू झाली असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सोमवारी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईत सोमवारी मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु झाली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या मार्गांना हिरवा कंदिल दाखवला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महाविकास आघाडीचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आजित पवार (ajit pawar), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar), मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aadtitya thackeray), कॉंग्रेस नेत बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांसह अनेक नेते उपस्थित होते.

'असा' असेल नव्या मेट्रोचा मार्ग 

मेट्रो २ए- डीएन नगर ते दहिसर 

१८.६ किमीचा मार्ग

६,४१०कोटींची तरतूद 

२०३१ पर्यंत ९ लाख प्रवासी प्रवास करतील 

मेट्रो 7- अंधेरी ते दहिसर 

१६.५ किमीचा मार्ग

६,२०८ कोटींची तरतूद 

२०३१ पर्यंत ६.७ लाख लोक प्रवास करतील

या २ मार्गांवर धावणारी मेट्रो पूर्ण भारतीय बनावटीची आहे. शिवाय, ही मेट्रो ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये मेट्रो ७ आणि मेट्रो २एचं सध्याचं कारशेड आहे. याच ठिकाणाहून मेट्रोची पहिली फेरी केली जाईल. मुंबईत ४ ते साडेचार वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणं हे आव्हानात्मक काम होतं. विशेषत: कोविड संकट आणि लॉकडाऊनमुळं मजुरांचं स्थलांतर हे या प्रकल्पातले मुख्य अडथळे ठरले.

मुंबईत पश्चिम उपनगरांत प्रवास करताना सर्वात कठीण प्रवास असतो तो पश्चिम द्रुतगती मार्गावरचा. या मार्गावरुन प्रवास करणारे मुंबईकर दररोज आपल्या आयुष्याचे अनेक तास हे प्रवासात आणि वाहतूक कोंडीतच घालवतात. मात्र, नवी मेट्रो  मुंबईकरांची ही सर्वात मोठ्या समस्येपासून सुटका करेल.

कसे असतील तिकीट दर?

  • 0-3 किमी -10 रुपये
  • 3-12 किमी - 20 रुपये
  • 12-18 किमी - 30 रुपये
  • 18-24 किमी - 40 रुपये
  • 24-30 किमी - 50 रुपये
  • 30-36 किमी - 60 रुपये 
  • 36-42 किमी - 70 रुपये  
  • 42-48 किमी - 80 रुपये 

या प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी १२ हजार कोटी प्रकल्पाचा खर्च आहे. त्यापैकी, आतापर्यंत साडेपाच ते ६ हजार कोटी खर्च झाले आहेत. बीईएमएल इथं तयार झालेल्या प्रत्येक कोचसाठी सरासरी ८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सरासरी १० कोटी रुपये खर्च येतात. त्यामुळे ही स्वदेशी कोच निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरलेली आहे.

सध्या ट्रायलसाठी एक मेट्रो रुळावर चालवली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण १० मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल होतील. मुंबईची ही नवी मेट्रो मुंबईची नवी लाईफलाईन असेल यात शंकाच नाही मात्र, ही नवी लाईफलाईन सध्या असणाऱ्या मेट्रो आणि लोकल प्रवासाच्या तुलनेत नक्कीच आरामदायी ठरु शकेल.



हेही वाचा -

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा