Advertisement

लालबाग उड्डाणपुलावर ट्रक उलटला, वाहतूक ठप्प


लालबाग उड्डाणपुलावर ट्रक उलटला, वाहतूक ठप्प
SHARES

लालबाग उड्डाणपुलावर सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास एक ट्रक उलटल्याने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. यामुळे भायखळ्याहून परळच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.


कशी घडली घटना?

सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास बिस्लरी बाटल्या घेऊन भायखळा इथून परळच्या दिशेने निघालेला एक ट्रक लालबाग उड्डाणपुलावर काळाचौकी परिसरात उलटला. अतिवेगामुळे वाहनचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा ट्रक उलटल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.


 


दोघेजण जखमी

त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकमधील जखमी वाहनचालक आणि क्लिनर यांना बाहेर काढून जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी पाठवलं.




ट्रक हटवण्याचा प्रयत्न

खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणपुलावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला असून सर्व वाहतूक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून सुरळीतपणे सुरू आहे. क्रेनच्या मदतीने ट्रकला उचलून बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून ट्रक हटल्यानंतरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेस घसरली, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा