Advertisement

खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेस घसरली, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत


खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेस घसरली, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत
SHARES

खंडाळ्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे.


कधी घडली घटना?

गुरूवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास मदुराई एक्स्प्रेस खंडाळ्याजवळ आलेली असताना या ट्रेनचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. मागच्या इंजिनाकडून दाब वाढल्याने हा डबा घसरल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.


कुठल्या ट्रेन रद्द?

या दुर्घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, कर्जत-पुणे पॅसेंजर या अप-डाऊन मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-भुसावळ पॅसेंजर मनमाड, दौंड मार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे.


वाहतूक उशीराने सुरू

या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हा डबा वेगळा केल्यावर सकाळी पावणेसहाच्या सुमारास एक्स्प्रेस पुढे रवाना झाली असली, तरी या मार्गावरील वाहतूक किमान अर्धा तास उशीराने सुरू आहे.

सध्या डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असून मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या गाड्या मीडल मार्गावरून पुढे सरकत आहेत. घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा