Advertisement

मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस आजपासून धावणार, व्हिस्टाडोम कोचचा घ्या अनुभव

कोरोना काळात रद्द करण्यात आलेली मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे.

मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस आजपासून धावणार, व्हिस्टाडोम कोचचा घ्या अनुभव
SHARES

कोरोना काळात रद्द करण्यात आलेली मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे. आजपासून ही एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

प्रगती एक्सप्रेस तिच्या नेहमीच्या वेळेत सकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी पुण्यातून सुटणार आणि 11 वाजून 25 मिनिटांनी मुंबईला पोहचणार आहे. तर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून 4 वाजून 25 मिनिटांनी रवाना होणार आहे तर 7 वाजून 50 मिनिटांनी पुण्यात पोहचणार आहे.

विस्टा डोममुळे प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल. पुणे-मुंबई मार्गावरील विस्टाडोम डब्यातून प्रवास करताना प्रवाशांना नद्या, दऱ्या, धबधबे यांच्या दृश्यांचा आनंद घेता येईल. ज्यामध्ये माथेरान डोंगर, सोनगीर डोंगर, उल्हास नदी, खंडाळ्यातील घाट परिसराचा समावेश आहे. विस्टाडोम कोचच्या विशेष आकर्षणांमध्ये रुंद खिडक्यांचे फलक आणि काचेचे छप्पर, जंगम जागा आणि पुशबॅक खुर्च्या यांचा समावेश आहे.

ज्या ट्रेनमध्ये हा डबा बसवला जात आहे त्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी एकूण 44 जागा आहेत. या आसने तर आरामदायी तर आहेतच शिवाय पाय मोकळी करण्यास भरपूर जागा आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोकही आरामात प्रवास करू शकतात. फिरत्या खुर्च्या देखील आहे.



हेही वाचा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: BKC मध्ये अंडरग्राऊंड स्टेशन होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा