Advertisement

बेस्ट कर्मचारी पुन्हा जाणार संपावर?

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत मतदान घेतलं. या मतदानाला बेस्ट कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी गोरेगावमधील केशव गोरे ट्रस्ट कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजून कौल दिल्यास ८ जानेवारी रोजी संप करण्यात येईल.

बेस्ट कर्मचारी पुन्हा जाणार संपावर?
SHARES

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत ८ जानेवारी २०१९ पासून बेस्ट क्रर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी कामगार संघटनांनी गुरुवारी संपाच्या निर्णयाबाबत मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गुरुवारी बेस्टच्या सर्वच आगारांमध्ये मतदान झालं असून शुक्रवारी या मतदानाचा निकाल लागणार आहे. त्यामुळं संपाच्या बाजूनं निकाल लागल्यास कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे.


मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत मतदान घेतलं. या मतदानाला बेस्ट कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी गोरेगावमधील केशव गोरे ट्रस्ट कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजून कौल दिल्यास ८ जानेवारी रोजी संप करण्यात येईल.


'या' आहेत मागण्या

बेस्टचा 'क' अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,९३० रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती करण्यात यावी, एप्रिल १६ पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करावी, २०१६-१७ आणि १७-१८ साठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस आणि कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा, अनुकंपा भरती सुरू करावी अशा मागण्या बेस्ट वर्कर्स युनियनने केलेल्या आहेत.


गुरुवारी झालेल्या मतदानाला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी गोरेगावमधील केशव गोरे ट्रस्ट कार्यालयात मतमोजणी होणार आहे. कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिल्यास ८ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात येईल.

- शशांक राव, अध्यक्ष, बेस्ट वर्कर्स युनियन


अर्थसंकल्प स्थायीत मंजूर

बेस्ट उपक्रमाचा २०१९ - २० चा अर्थसंकल्प गुरुवारी स्थायी समितीने कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करून सभागृहाकडे पाठवला. बेस्ट प्रशासनाला १ एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळं हा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर झाला असला तरी, सभागृहात मंजूर होणे महत्वाचं आहे. मात्र, या अर्थसंकल्पाआधी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार का? यावर बेस्टच्या अर्थसंकल्पाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.



हेही वाचा-

'बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देणार, पण तारीख नाही सांगणार'

सज्ज व्हा! मुंबई-नाशिक लोकल प्रवासासाठी, चाचणी सुरू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा