Advertisement

'बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देणार, पण तारीख नाही सांगणार'

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण बेस्टनं सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळं कर्मचाऱ्यांना ५५०० रुपये बोनस मिळणार आहे. परंतु, बोनस कधी मिळणार याची तारीख बेस्ट प्रशासनानं निश्चित केली नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना अजून काही दिवस बोनससाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

'बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देणार, पण तारीख नाही सांगणार'
SHARES

''मंदिर वही बनाएंगे, लेकीन तारीख नही बताऐंगे'', हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. अशीच काहीशी तऱ्हा बेस्ट कर्मचाऱ्यांची झालीय. कारण त्यांना दिवाळी बोनसच्या नावाखाली केवळं मिळताहेत ती फक्त आश्वासनं. दिवाळी उलटून महिना झाला, तरी बेस्टचे कर्मचारी अजूनही बोनसच्या प्रतीक्षेतच आहेत. नुकत्याच झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावही मंजूर करण्यात आला. परंतु कर्मचाऱ्यांना बोनस नक्की कधी मिळणार, याची तारीख अद्यापही समजू शकलेली नाही.

बैठकीत मार्ग मोकळा

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण बेस्टनं सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळं कर्मचाऱ्यांना ५५०० रुपये बोनस मिळणार आहे. परंतु, बोनस कधी मिळणार याची तारीख बेस्ट प्रशासनानं निश्चित केली नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना अजून काही दिवस बोनससाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

आश्वासन पोकळ

दिवाळीपूर्वी झालेल्या बैठकीत बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना ५५०० रुपयांचा बोनस देण्याचं जाहीर केलं होते. परंतु, त्यावेळी बोनसबाबत रितसर प्रस्ताव तयार केला नव्हता. त्यानंतर मागील काही दिवसांत झालेल्या बेस्ट समिताच्या बैठकीमध्ये महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी आणलेला प्रस्ताव प्रशासनाने मांडला. मात्र बोनसबाबतचा हा प्रस्ताव आयत्यावेळी आल्याचं सांगत विरोधी पक्ष नेत्यांनी प्रस्ताव विचारात घेण्यास विरोध केला होता.

प्रस्ताव मंजूर

दरम्यान, सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून बोनसचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला. या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. परंतु बोनसची तारीख निश्चित करण्यात न आल्याने बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत आणि सुनील गणाचार्य यांनी प्रशासनानाने सानुग्रह अनुदान देण्याची तारीख घोषित करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा-

म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला

ग्राहकांनो, वाढीव वीजबिलाचे पैसे परत मिळणार तेही व्याजासकट, अदानीला दणका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा