Advertisement

वडाळा ते कासारवडवली सुपरफास्ट!


वडाळा ते कासारवडवली सुपरफास्ट!
SHARES

मुंबई - मेट्रो-4 अर्थात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्गाला मंगळवारी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे वडाळ्यातून ठाण्यात अवघ्या 64 मिनिटांत पोहोचणे आता शक्य होणार आहे.
 मुंबईत दोन वर्षांपूर्वीच मेट्रो धावू लागली. पण वडाळ्यावरून थेट ठाण्यात गारेगार मेट्रोतून प्रवास करून जाण्याचे मुंबईकरांचे स्वप्न बराच काळ रेंगाळले होते. आता मात्र या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आल्याने हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रो-4 प्रकल्पाबरोबरच मेट्रो-2 ब अर्थात डीएननगर-वांद्रे-मानखुर्द या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे.

कसा असेल मेट्रो-4 प्रकल्प -

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली
एकूण 32 किमी अंतर
14, 549 कोटी रुपये खर्च अपेक्षित
ठाणे ते कासारवडवली प्रवास 64 मिनिटांत
साडे आठ लाख प्रवाशांना होणार लाभ

असा असेल मेट्रो -2 प्रकल्प -

डीएननगर-वांद्रे-मानखुर्द
23.5 किमी अंतराचा मार्ग
10,986 कोटी रुपये खर्च अपेक्षित
पश्चिम, मध्य आणि पूर्व उपनगरे थेट जोडली जाणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा