प्रभूंची वर्धा-नागपूर चौपदरीकरणाला मंजुरी

 Mumbai
प्रभूंची वर्धा-नागपूर चौपदरीकरणाला मंजुरी
प्रभूंची वर्धा-नागपूर चौपदरीकरणाला मंजुरी
प्रभूंची वर्धा-नागपूर चौपदरीकरणाला मंजुरी
See all

मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असलेल्या वर्धा-नागपूर या भागात चौथी लाईन उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. 638 कोटी रुपयांच्या या नव्या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. सध्या हा मार्ग दुपदरी असून, या मार्गावर तिसरी लाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी मान्यता दिल्यानंतर लवकरच हा मार्ग चौपदरी होणार आहे. त्याचा फायदा चेन्नई-दिल्ली आणि मुंबई-कोलकाता या दोन्ही मार्गांवरील चाकरमान्यांना तर होणार आहेच, पण मालवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे.

उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अशा दोन्ही मार्गांवर येणारा वर्धा-नागपूर हा भाग मध्य रेल्वेवरील अत्यंत अडचणीच्या भागांपैकी एक आहे. 78 किलोमीटरच्या या भागातील वाहतूक सध्या दोन मार्गांवरून चालत असल्याने या मार्गावर प्रवासी तसेच मालवाहतुकीला त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे वर्धा-नागपूर या दरम्यान तिसरी मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पाला याआधीच मंजुरी देण्यात आली होती आणि या मार्गिकेचे युध्द पातळीवर कामही सुरू झाले आहे. वर्धा-नागपूर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

वर्धा-नागपूर या दरम्यान चौथी लाईन टाकण्याचा प्रस्ताव याआधीच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. रेल्वेबोर्डाने मंजूर केलेला हा प्रस्ताव निती आयोगाकडे गेला असता निती आयोगानेही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. बुधवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या कामात 147 पूल बांधण्यात येणार आहेत. आता 638 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होणार आहे.

Loading Comments