
वेस्टर्न रेल्वे (WR) मार्गावरील प्रवाशांना पुढील काही दिवस तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर Complete Track Renewal (CTR) कामासाठी 60 दिवसांचा मोठा ब्लॉक सुरू करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या कामामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले असून काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
सुरक्षितता आणि ट्रॅक अपग्रेडसाठी ब्लॉक आवश्यक - वेस्टर्न रेल्वेवेस्टर्न रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, मुंबईतील अत्यंत व्यस्त टर्मिनलपैकी एक असलेल्या मुंबई सेंट्रल येथे ट्रॅकची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि गाड्यांची हालचाल अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी हा ब्लॉक अत्यावश्यक आहे.
प्रभावित गाड्या: शॉर्ट टर्मिनेशन / आंशिक रद्दIn a view of Complete Track Renewal work on Platform No. 4 of Mumbai Central station, a block of 60 days is being undertaken, due to which a few Western Railway trains will be affected. pic.twitter.com/1RCmBGrblQ
— Western Railway (@WesternRly) December 1, 2025
खालील गाड्या आता मुंबई सेंट्रलऐवजी दादर येथेच थांबवण्यात येतील. दादर ते मुंबई सेंट्रल हा प्रवास आंशिक रद्द राहील:
22946 ओखा - मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस
22210 हजरत निजामुद्दीन - मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस
09086 इंदूर - मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस
09076 काठगोदाम – मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस
09186 कानपूर अनवरगंज – मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस
वेस्टर्न रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, ब्लॉक सुरू असताना गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासापूर्वी अपडेट्स तपासाव्यात आणि आपला प्रवास त्यानुसार नियोजित करावा.
