Advertisement

वांद्रे स्थानकातील 'तो' पूल प्रवाशांसाठी खुला


वांद्रे स्थानकातील 'तो' पूल प्रवाशांसाठी खुला
SHARES

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं अनेकांचा रोजगार गेला, तर अनेकांनी आपला व्यवसाय सुरू केला. अशातच पश्चिम रेल्वे प्रशासनानं ही या लॉकडाऊचा चांगला फायदा उचलला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनानं अनेक पादचारी पुलांची काम पूर्ण केली आहेत. यामध्ये वांद्रे स्थानकाचाही समावेश आहे.

पश्चिम रेल्वेनं वांद्रे रेल्वे स्थानकात ६ मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारला आहे. या पादचारी पुलाचं काम रविवार २८ सप्टेंबर रोजी पूर्ण झालं. तसंच, हा पूल प्रवाशांसाठी योग्य ठरणार आहे. हा पूल वांद्रे स्थानकाच्या सर्व स्थानकांना जोडण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी हा पूल ८० मीटर लांब व ६ ममीटर रुंद असल्याची माहिती दिली.

या पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मिळते. या पुलाची आयआयटी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हा पूल धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं हा पुलाची दुरुस्ती करण्यात आली. या पुलाचं काम एप्रिल २०१९ मध्ये सुरू करण्यात आलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा