Advertisement

लोकलच्या जनरल डब्यांना एसी डबे जोडण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार

यासाठी पश्चिम रेल्वे बोर्डानं ६ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

लोकलच्या जनरल डब्यांना एसी डबे जोडण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार
SHARES

लोकलच्या जनरल डब्यांना एसी डबे जोडण्याचा विचार केला जात आहे. यासाठी पश्चिम रेल्वे बोर्डानं ६ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यात सर्वसाधारण श्रेणीचे विभागदेखील असतील. आतापर्यंत, १२-कार एसी रॅकमध्ये सहा कोचचे दोन सेट आहेत. त्यात प्रथम किंवा सामान्य वर्गांचा समावेश नाही.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल म्हणाले की, समिती सध्या या संदर्भात विचारविनिमय करीत असून लवकरच आपल्या शिफारशी सादर करेल.

समितीमध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता, मध्य रेल्वेचे मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक (प्रवासी विपणन), WR इथं मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक, इंटिग्रल कोच फॅक्टरीचे मुख्य डिझाइन अभियंता (आयसीएफ) आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एक अधिकारी असतील.

पश्चिश रेल्वेनं चर्चगेट आणि विरार दरम्यान डिसेंबर २०१७ मध्ये एसी लोकल सुरू केली. असं म्हटलं जातं की, १२ एसी सेवांचा सुमारे २० हजार प्रवासी दररोज वापर करतात.

६ एसी रॅक असूनही दोन रॅकसह केवळ १२ एसी सेवा चालवतात. कारण विद्यमान नॉन-एसी गाड्यांची जागा बदलल्यास सर्वसाधारण वर्गावरील दैनंदिन प्रवाशांचे हाल होऊ शकतात.

“एसी लोकलमध्ये प्रथम श्रेणीचे कप्पे नसतील. प्रथम श्रेणी प्रवाशांना त्यांचे प्रथम श्रेणी हंगामातील तिकिटे एसी वर्गात अपग्रेड करावी लागू शकतात,”कांसल पुढे म्हणाले.

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आमच्या मते सेमी-एसी लोकल ९ नॉन-एसी प्लस ३ एसी (१२ कार) आणि ९ नॉन-एसी प्लस ६ एसी (१५ कार) यांच्या संयोजनात चालवता येतील.”

अंधेरी-विरार दरम्यान प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम संपल्यानंतर पश्चिम रेल्वे स्लो कॉरिडॉरवर १५ कार एसी लोकल चालवणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण केली जातील.

काही अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे, की सेमी-एसी लोकल जोडल्यामुळे गाड्या कमी विरामदायक होऊ शकतात.

“नॉन-एसी लोकलसाठी सुमारे १५ ते २० सेकंदाची प्रतीक्षा करावी लागते. परंतु एसी लोकलसाठी स्थानकांवरील प्रतीक्षा वेळ ४५ सेकंदापर्यंत वाढू शकतो. कारण दरवाजे बंद झाल्यावरच ट्रेन चालू शकते, ”असं रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा