Advertisement

अाता रांगेत थांबू नका! ‘कियोस्क’ मशीनद्वारे घ्या रेल्वेचं तिकीट


अाता रांगेत थांबू नका! ‘कियोस्क’ मशीनद्वारे घ्या रेल्वेचं तिकीट
SHARES

रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेमध्ये थांबण्याचा त्रास अाता तुम्हाला होणार नाही. कारण मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवरही मोबईल तिकीट वेंडिंग कियोस्क मशीन गुरुवारी बसविण्यात अाल्या अाहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या ५ स्थानकांवर या कियोस्क मशीन बसविण्यात अाल्या अाहेत. लोकलचं तिकीट यूटीएस मोबाईल अॅपवर बुक केल्यानंतर त्याची छापील प्रिंटअाऊट मिळवण्यासाठी मोबाईलचा एसएमएस कोड मशीनवर स्कॅन केल्यानंतर तिकीटाची छापील प्रत प्राप्त करता येऊ शकते.


या ५ स्थानकांवर मशीन्स

चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली या पश्चिम रेल्वेच्या प्रमुख पाच स्थानकांवर ही सुविधा देणाऱ्या मोबाईल तिकीट वेंडिंग ‘कियोस्क’ मशीन बसवण्यात आल्या आहेत. ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन कियोस्क मशीनपैकी २० मशीन पाच प्रमुख स्थानकांवर बसवण्यात आल्या आहेत.


एसएमएस स्कॅनद्वारे प्रिंटआऊट

यूटीएस मोबाईल अ‍ॅपवर लोकलचे ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर येणारा ‘एसएमएस’ या कियोस्क मशीनवर स्कॅन केला, की काही सेकंदात तिकीटाचे प्रिंट काढता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्हीही वाचणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.


पूर्वी लागायच्या रांगा

यापूर्वी यूटीएस मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट बुक करणाऱ्यांना आपल्या तिकीटाचे प्रिंटआऊट हवे असेल तर मोबाईलवर प्राप्त होणारा बुकिंग आयडी आणि मोबाईल क्रमांक एटीव्हीएमवर किंवा यूटीएस काऊंटरवर जाऊन पुन्हा फिड करावा लागायचा. त्यासाठीही एटीव्हीएम मशीनवर रांगा लावाव्या लागायच्या. आता याची गरज पडणार नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा