Advertisement

उन्हाळी सुट्टीसाठी 'परे'च्या विशेष गाड्या


उन्हाळी सुट्टीसाठी 'परे'च्या विशेष गाड्या
SHARES

सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने कारणाने मुंबईकर आपल्या गावी किंवा फिरायला जाण्याचा बेत करत असतात. हिच बाब लक्षात घेत 'परे'नं उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत. वांद्रा टर्मिनस-भूज आठवड्यातून दोनवेळा तसेच सोमनाथ पूरी साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. 09031/09032 वांद्रे टर्मिनस-भूज ही आठवड्यातून दोन दिवस सुपरफास्ट रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे वांद्रे टर्मिनसवरून सोमवारी तसेच बुधवारी 20.55 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी मंगळवारी तसेच गुरुवारी 14.50 वाजता भूज येथे पोहोचणार आहे. या दोन्ही रेल्वे 24 एप्रिल 2017, 26 एप्रिल आणि 1 मे 2017 तसेच 3 मे 2017 ला चालवण्यात येणार आहेत.तसेच भूजवरून दोन गाड्या मंगळवार आणि गुरुवार रात्री 9.30 वाजता सुटणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय