Advertisement

म्हणून लष्कर बांधणार एल्फिन्स्टनचा फूटओव्हर ब्रिज


म्हणून लष्कर बांधणार एल्फिन्स्टनचा फूटओव्हर ब्रिज
SHARES

एल्फिन्स्टन दुर्घटनेला एक महिना उलटल्यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. एल्फिन्स्टनसह मध्य रेल्वेवरील करी रोड आणि आंबीवली स्थानकातील पुलाचे बांधकाम भारतीय लष्कर करणार असल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. त्यामुळे हे पूल लष्कराकडून का बांधून घेतले जात असल्याचा प्रश्न विचारण्यात येत होता.


लष्कराकडूनच का बांधले जातेय पूल

जर हे पादचारी पूल लष्कराने बांधले तर, 4 महिन्यांची बचत होऊ शकते. कारण, रेल्वेकडून पुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची निविदा मंजूर होण्यासाठीच फक्त 4 महिने लागतात. तोपर्यंत लष्करातर्फे हे पूल बांधून तयार होतील. शिवाय, लष्कराकडे पुलाकडे लागणाऱ्या साहित्याचा साठा असतो.


कसे आणि कधी होणार पूल तयार?

‘बेली पूल पद्धतीचे’ तंत्रज्ञान वापरून हे पूल बांधणार आहेत. त्याचं टेंडर 6 नोव्हेंबरला सादर केलं जाईल. त्यानंतर एका आठवड्यात पुलाचं काम सुरू करण्यात येईल. बीआरओ, आर्मी आणि ग्रेफ यातील काही एक्सपर्ट या कामात मदत करणार आहे. मनुष्यबळ कमी असूनही लष्करी दल हे पूल बांधण्यासाठी समर्थ असणार आहे. प्रवाशांची ये-जा सुरू असताना या पुलाचं काम सुरू राहणार आहे. शिवाय, रेल्वेही लष्कराशी वारंवार सन्मवय साधणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि भारतीय सेना या पुलांच्या कामासाठी हातभार लावणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी स्पष्ट केलं. या कामाच्या सन्मवयासाठी एक कमिटी नेमली जाणार आहे. शिवाय, लष्कर अधिकारी ही या संपूर्ण प्रक्रियेचा भाग असणार आहे.

रेल्वेने आतापर्यंत 3 वर्षात 24 पादचारी पुलाची बांधणी केली आहे. तर, पुढच्या 1 ते दीड वर्षात आणखी 29 पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे.


अशी होणार बांधणी -

एल्फिन्स्टन रोड स्थानकात पश्चिम रेल्वेतर्फे प्रस्तावित 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारण्यात येेणार आहे. लष्करातर्फे बांधण्यात येणारा पूल अतिरिक्त असणार आहे.

त्यात प्रामुख्याने परळ स्टेशनवरील दादर दिशेकडील कमी वापराचा पूल हा एल्फिन्स्टन रोडकडील फुलबाजार असलेल्या रस्त्याला जोडण्यात येणार आहे. हा पूल 10 फूट रुंदीचा असून थेट फुलबाजाराला जोडला जाणार असल्याने एल्फिन्स्टन रोड पुलावरील गर्दी कमी होईल, असा दावा केला जात आहे.



हेही वाचा - 

भारतीय सैन्य बांधणार एल्फिन्स्टन फूटओव्हर ब्रिज

'आजारापेक्षा इलाज भयंकर...' करी रोडचा नवा पूलही अरूंद!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा