भारतीय सैन्य बांधणार एल्फिन्स्टन फूटओव्हर ब्रिज

एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला. या घटनेनंतर प्रवाशांनी अनेकदा या अरुंद पुलामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार रेल्वेला केली होती. आता या पूलाचे बांधकाम भारतीय सैन्यांकडून केले जाणार आहे.

SHARE

एल्फिन्स्टन-परळ स्थानकवारील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला. या घटनेनंतर प्रवाशांनी अनेकदा या अरुंद पुलामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार रेल्वेला केली होती. आता या दुर्घटनेला १ महिना पूर्ण झाल्यानंतर रेल्वे‌ प्रशासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी केली. 

पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पुलासह, मध्य रेल्वेवरील करी रोड  आणि आंबिवली स्थानकातील पुलाचे काम 31 जानेवारीपर्यंत सैन्य दलाकडून करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.भारतीय सैन्य बांधणार पूल -

5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर पुलाच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे. एल्फिन्स्टन रोड, दादरसारख्या मुंबईतील गर्दीच्या स्टेशनांवर वेगाने पर्यायी पादचारी पूल बांधले जावेत, यासाठी आता लष्कराचे अभियंते रेल्वे प्रशासनाला मदत करणार आहेत. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाने पुलाची जागा निश्चित केल्यानंतर, लष्कराचे अभियंते पुलाचा आराखडा तयार करून आत्ताच्या पुलाला समांतर असा तात्पुरता पूल उभा राहील. त्यानंतर पादचारी पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा तात्पुरता पूल काढून टाकला जाईल. 31 जानेवारीपर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भारतीय सैन्यातील इंजिनीअरिंग विंग आपत्कालीन परिस्थितीत पूल बांधते. कमीत कमी वेळात मिलिटरीकडून हा पूल बांधला जाईल. यापूर्वी राष्ट्रकूल स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर मिलिटरीने तो लवकरात लवकर बांधून दिला होता.
हे सगळं राजकारण आहे. मी गेली 3 वर्ष या सगळ्याचा पाठपुरावा करतोय. पण आता याना जाग आली. राजकारण करून आम्हाला डावलायचे आणि त्यांच्या कुणीतरी नेत्याने निवेदन दिल्यामुळे हे काम होतंय असे भासवायचे ही भाजपाची खेळी आहे.
अरविंद सावंत, खासदार शिवसेना


हेही वाचा -

'आजारापेक्षा इलाज भयंकर...' करी रोडचा नवा पूलही अरूंद!


संबंधित विषय
ताज्या बातम्या