Advertisement

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरिवली ते विरारदरम्यान प्रवास होणार गतिमान

बोरिवली ते दहिसरदरम्यान ३० किमी प्रतितास या वेगाने लोकल धावणार

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरिवली ते विरारदरम्यान प्रवास होणार गतिमान
SHARES

बोरिवली ते विरार दरम्यान लोकलचा प्रवास गतिमान होण्यास मदत होणार आहे.

बोरिवली ते दहिसर दरम्यान लोकलचा वेग  मंदावतो. क्रॉस ओव्हर असल्याने या ठिकाणी वेग कमी होतो. मात्र बोरिवली ते दहिसर स्थानक यादरम्यान रेल्वेरूळ आणि पॉइंटसंबंधी तांत्रिक कामे हाती घेण्यात आली होती.

बोरिवली ते दहिसर दरम्यानचा लोकल प्रवास गतिमान करण्यासाठी ही तांत्रिक कामे हाती घेण्यात आली होती. आता ही महत्वाची कामे पूर्ण झाली असून बोरिवली ते दहिसर अन विरार असा लोकलचा प्रवास गतिमान होणार आहे.

बोरिवली फलाट क्रमांक आठवरून डाउन जलद मार्गावरून विरारच्या दिशेने पॉईंट मध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच अप जलद दिशेनेही पॉइंटमध्ये बदल करण्यात आले आहेत. या तांत्रिक कामांमुळे आतापर्यंत लोकल १५ किमी प्रतितास अशी धावत होती. 

पण आता काम पूर्ण झाले आहे म्हणून बोरिवली ते दहिसरदरम्यान ३० किमी प्रतितास या वेगाने लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आता बोरिवलीतील अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांचा वेग आधीच्या तुलनेत वाढणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

साहजिकच यामुळे लोकलचा प्रवास गतिमान होणार आहे. बोरिवली ते विरार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जलद गतीने लोकलचा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य असा वेळ वाचणार आहे. निश्चितच रेल्वेने केलेली ही तांत्रिक कामे रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर राहणार आहेत.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा