Advertisement

रेल्वे प्रवास अधिक सोईस्कर करण्यासाठी पश्चिम रेल्वेची 2,206 कोटींची गुंतवणूक

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने 19 रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी 2206 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

रेल्वे प्रवास अधिक सोईस्कर करण्यासाठी पश्चिम रेल्वेची 2,206 कोटींची गुंतवणूक
SHARES

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबई विभागाने 19 रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी 2206 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्तींना सोईस्कर प्रवास अनुभवता यावा यावरही अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई (Mumbai) विभागाने त्यांच्या स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी 2,206 कोटींची योजना जाहीर केली आहे. यामध्ये स्थानकांचा विस्तार, स्थानकांवरील प्रतिक्षागृहांचे आधुनिकीकरण, स्वयंचलित जिन्यांच्या संख्येत वाढ आणि बऱ्याच सोईसुविधांचा समावेश करण्यात आला आहे. 

एकूण 19 स्थानकांवर हे काम हाती घेण्यात येणार आहे. उपनगरीय स्थानकांमध्ये मरीन लाइन्स (Marine Lines), चर्नी रोड (Charni Road), ग्रँट रोड (Grant Road), लोअर परळ (Lower parel), प्रभादेवी (Prabhadevi), मालाड (Malad), जोगेश्वरी (Jogeshwari) कोचिंग टर्मिनल आणि पालघर (Palghar) यांचा समावेश आहे.

मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले, “दिव्यांगजनांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा निर्माण करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. व्हीलचेअर वापरकर्ते आणि शरीराची हालचाल करणे शक्य नसलेल्या प्रवाशांसाठी सुलभ सुविधा उभारण्यासाठी प्रमुख स्थानकांवर रॅम्प आणि रेलिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.”

याशिवाय, अपंगांसाठी खास डिझाईन केलेली शौचालये, पिण्याच्या पाण्याचे बूथ आणि स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ राखीव पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली जाईल. सर्व गैर-उपनगरीय स्थानकांवर सुमारे 86 व्हीलचेअर उपलब्ध असतील आणि उपनगरीय स्थानकांवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर किमान एक व्हीलचेअर असेल. 

सध्या, 24 स्थानकांवर 69 लिफ्ट कार्यान्वित आहेत, त्यात आणखी 13 लिफ्ट प्रगतीपथावर आहेत. दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ प्रवासी या दोघांनाही सोपे जावे यासाठी पावसाळ्यानंतर आणखी 13 लिफ्टचे नियोजन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेकडे आधीच 33 स्थानकांवर 121 स्वयंचलित जिने आहेत. आणखी एक स्वयंचलित जिना लवकरच राम मंदिर स्थानकावर सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच आणखी 12 स्वयंचलित जिन्यासाठी 20.76 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पावसाळ्याचा विचार करून प्लॅटफॉर्म विस्ताराची कामेही प्रगतीपथावर आहेत. वेटिंग रूमच्या आधुनिकीकरणामध्ये सुधारित आसनव्यवस्था समाविष्ट असेल. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी, 97 वॉटर व्हेंडिंग मशिन्स स्थापित केल्या जात आहेत, 34 आधीच कार्यरत आहेत.

तसेच, मुंबई सेंट्रल स्टेशनवर डिजिटल माहिती देणाऱ्या स्क्रीन स्थापित करण्यात आल्या आहेत. 5.34 कोटी खर्चून प्रवाशांना चांगल्या माहितीसाठी अनेक स्थानकांवर ट्रेन इंडिकेटर बोर्डसह एक मार्गदर्शन प्रणाली स्थापित केली जात आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 513.16 कोटी रुपये खर्चाची 56 कामे राबवण्यात येत आहेत. संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये रेल्वे स्थानके वाढवणे आणि आधुनिकीकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 

काही कामांमध्ये 17 स्थानकांवर रूफ प्लाझा म्हणून नियोजित किरकोळ किऑस्कसह 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज बांधणे समाविष्ट आहे. पश्चिम रेल्वे वाय-फाय सेवेसोबतच मोबाइल ॲप्स सारख्या उपक्रमांवरही विचार करत आहे.हेही वाचा 

प्रवाशांनो लक्ष द्या! 3 दिवस इंटरसिटी आणि डेक्कन एक्सप्रेस बंद

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा