Advertisement

प्रवाशांना चर्चगेट, अंधेरी स्थानकात आता फेशियल, दाढी करता येणार

चर्चगेट आणि अंधेरी रेल्वे स्थानकांत सलून सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

प्रवाशांना चर्चगेट, अंधेरी स्थानकात आता फेशियल, दाढी करता येणार
SHARES

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि अंधेरी या रेल्वे स्थानकांत फावल्या वेळेत प्रवाशांना फेशियल, दाढी आणि सलूनमधील अन्य सुविधा मिळणार आहेत. चर्चगेट आणि अंधेरी रेल्वे स्थानकांत सलून सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

सलून सेवांच्या या अनोख्या संकल्पनेचा फायदा रोजच्या कार्यालयात जाणाऱ्यांना होणार आहे. दोन्ही करार एप्रिल 2023 ते एप्रिल 2026 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आले आहेत.

या सूलनमध्ये केस कापण्यासाठी १९९ रुपये, तर दाढी करण्यासाठी ९९ रुपये मोजावे लागणार आहेत. प्रवाशांसाठी ३० रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंतच्या विविध सेवा उपलब्ध असणार आहेत.

प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी ‘नॉन फेअर रेव्हेन्यू’ योजनेअंतर्गत महिला आणि पुरुषांसाठी सलून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चगेट स्थानकात सलून खुले झाले असून अंधेरीसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे.

डेकवर ३२० चौरस फूट जागेत सलून सुरू करण्यात आले. या स्थानकातून तीन वर्षांसाठी २९ लाख १० हजारांचा महसूल प्राप्त होणार आहे.

दोन्ही सलूनमुळे पश्चिम रेल्वेला तीन वर्षांत ९६ लाखांपेक्षा अधिक महसूल प्राप्त होणार आहे, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा