Advertisement

पश्चिम रेल्वे होणार फेरीवाला मुक्त


पश्चिम रेल्वे होणार फेरीवाला मुक्त
SHARES

मुंबई - पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचं बस्तान असल्यामुळे त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भातील तक्रारींची दखल घेत रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) पश्चिम रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवली आहे.

आतापर्यंत या मोहिमे अंतर्गत 1 हजार 200 फेरीवाल्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 12 लाखांची दंडवसूली केल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली. या प्रकरणात पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी जातीने लक्ष घालत रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाला मुक्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे

 

विशेष म्हणजे, फेरीवाल्यांविरोधात प्रथमच अशा पद्धतीची सर्वात मोठी मोहीम राबवली जात असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलंय. रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांची कायमची हकालपट्टी करण्याबाबतचा निर्णय पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त आनंद झा यांनी घेतला आहे. मुंबई महापालिका, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिकांच्या आयुक्तांना फेरीवालामुक्त संदर्भातील परिपत्रक पाठवले आहे. रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वाराबाहेर (पूर्व-पश्चिम) आणि पादचारी पुलांवर फेरीवाल्यांची मुजोरी चालते. या परिसरात महापालिकांनी कारवाई करून त्या जागांना `ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करा असे आदेश दिल्याचे रेल्वे विभागाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा